Sunday, July 26, 2026
Homeक्राईमCrime News : लिव्ह-इन संबंधातील वादातून तरूणीला धमक्या

Crime News : लिव्ह-इन संबंधातील वादातून तरूणीला धमक्या

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तरूण-तरूणीमध्ये झालेल्या वादातून तरूणीला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी एका तरूणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (23 नोव्हेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

- Advertisement -

सावेडी उपनगरातील तपोवन रस्ता, कजबे वस्ती येथे राहत असलेल्या 30 वर्षीय पीडित तरूणीने रविवारी दुपारी फिर्याद दिली आहे. गणेश चितळे (पूर्ण नाव माहिती नाही, वारूळाचा मारूती, नालेगाव, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश चितळे याच्यासोबत मागील तीन महिन्यांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.

काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातूनच 23 नोव्हेंबरच्या मध्यरात्री गणेशने फिर्यादीला वारंवार फोन करून शिवीगाळ केली तसेच मी तुला बघून घेईन अशा स्वरूपाची धमकी दिली, असा आरोप फिर्यादीने केला आहे. दरम्यान, पीडितेने घडलेला प्रकार तोफखाना पोलिसांना सांगितला. पोलिसांनी गणेश चितळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करीत आहेत.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “सेलिब्रेशनसाठी त्यांना कारण मिळाल्याचा मला आनंद”; CM फडणवीसांचा...

0
मुंबई | Mumbai नीट पेपरफुटी प्रकरणात (Neet Paper Leak) विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी...