Monday, July 22, 2024
Homeनगरआजीसोबत घरी जाणार्‍या तरुणीचा विनयभंग

आजीसोबत घरी जाणार्‍या तरुणीचा विनयभंग

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

शहराजवळील घुलेवाडी (Ghulewadi) येथे एक बावीसवर्षीय तरुणी आपल्या आजीसोबत घरी जात असताना तरुणाने तरुणीचा पाठलाग करुन सदरा ओढत विनयभंग (Molested) केल्याची घटना शुक्रवारी (दि. 21 जून) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत (Sangamner City Police) लोणी येथील तरुणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली बावीसवर्षीय तरुणी आपल्या आजीसोबत घुलेवाडी येथे घरी जात होती.

त्याचवेळी आकाश दत्तात्रय बलसाने (रा. लोणी, ता. राहाता) या तरुणाने साईश्रद्धा चौकात पाठलाग करुन तरुणीच्या अंगावरील सदरा ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी तरुणीने सदरा फाटल्याने आरडाओरड केली असता आकाश बलसाने याने शिवीगाळ व दमदाटी करुन तेथून धूम ठोकली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आकाश बलसाने याच्यावर विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोहेकॉ. वायकर या करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या