Saturday, July 27, 2024
Homeनगरयुवतीला ऑनलाईन साडेतीन लाखांना गंडा

युवतीला ऑनलाईन साडेतीन लाखांना गंडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्याचा टास्क पूर्ण केल्यास अधिक पैसे देण्याच्या उद्देशाने एका युवतीची तीन लाख 50 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या युवतीने शनिवारी (दि. 15) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी युवतीच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर 12 जून रोजी दुपारी एका अनोळखी मोबाईलवरून मेसेज आला. तुम्ही युट्यूबवरती आमच्या चॅनलचे लाईक आणि सबस्क्रायबर वाढविण्यासाठी आम्ही पाठविलेल्या लिंकला ओपन करून त्या लिंकचे लाईक आणि सबस्क्रायबर वाढवण्याचे टास्क देऊन तो टास्क पूर्ण झाल्यावर तुमच्या अकाऊंटला पेमेंट जमा होईल, असा तो मेसेज होता. दरम्यान, फिर्यादी युवतीने आलेल्या लिंकवर ओपन करून लाईक आणि सबस्क्रायबरचे पाच टास्क पूर्ण केले.

सहावा टास्क पूर्ण करण्यासाठी अगोदर त्यांना पैसे पाठवायचे होते. फिर्यादी यांनी टप्प्याटप्प्याने तीन लाख 50 हजार रुपये पाठविले. त्यांनी दिलेले पैसे परत मागितले असता समोरील व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला व फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या