Sunday, July 26, 2026
Homeक्राईमCrime News : युवतीला ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार

Crime News : युवतीला ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देत एका युवतीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना दरेवाडी (ता. अहिल्यानगर) शिवारात घडल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगर शहरात राहणार्‍या पीडित 24 वर्षीय युवतीने यासंदर्भात रविवारी (21 जून) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द अत्याचारासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अजय जगन बेरड (रा. हरीकृष्ण नगर, दरेवाडी, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी तरूणाचे नाव आहे. डिसेंबर 2023 पासून ते जानेवारी 2026 पर्यंत वेळोवेळी ही घटना घडली आहे. संशयित आरोपी अजय बेरड याने फिर्यादीच्या असहायतेचा गैरफायदा घेतला. अजय याने फिर्यादीचे फोटो सार्वजनिक ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

या धमकीला घाबरून त्याने वेळोवेळी पीडितेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. पीडिताने जेव्हा या प्रकाराला विरोध केला, तेव्हा अजय याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करत ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून अजय बेरड विरोधात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.

ताज्या बातम्या

पुढील 4 दिवस धो-धो, वादळी पावसाची शक्यता; राज्यात कुठं-कुठं कोसळधारा?

0
मुंबई । Mumbai राज्यात गेल्या काही दिवसांपासून काहीसा मंदावलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढू लागला असून, हवामान विभागाने...