Wednesday, April 29, 2026
HomeनगरSuicide News : युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide News : युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बोल्हेगाव उपनगरात एका युवतीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. गौरी नवसुपे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. ही घटना रविवारी (8 जून) रात्री उघडकीस आली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गौरी नवसुपे यांनी त्यांच्या राहत्या घरी छताच्या पंख्याच्या लोखंडी हुकास दोरी बांधून गळफास घेतल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

गंभीर अवस्थेत असलेल्या गौरी यांना त्यांचे नातेवाईक लक्ष्मण सुखदेव दुबे यांनी तत्काळ येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती डॉ. शिंदे यांनी तोफखाना पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास महिला पोलीस अंमलदार प्रमीला गायकवाड करीत आहेत.

ताज्या बातम्या