Friday, May 16, 2025
Homeमुख्य बातम्यातरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई | Mumbai

- Advertisement -

चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur district) ब्रम्हपुरी शहरातील (Bramhapuri City) न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या गेटवर एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे…

याबाबत अधिक माहिती अशी की, पौर्णिमा मिलिंद लाडे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव (चोप) येथील रहिवासी आहे. ब्रह्मपुरी शहरात न्यायालयाच्या (Court) नवीन इमारतीचे बांधकाम सुरूअसून सोमवारी रात्री बांधकाम करणारे कामगार कामावरून घरी गेले. त्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास परिसरातील नागरिकांना न्यायालयाच्या गेटवरच तरुणीचा मृतदेह (Body) गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना (Police) दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राजनाथ

Rajanath Singh: ‘कागज का है लिबास चरागों का शहर है, संभल-संभल...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. त्यांनी जवानांची भेट घेत त्यांचे भरभरून कौतुक केले....