Friday, October 23, 2026
Homeक्राईमCrime News : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार

Crime News : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार

भावाच्या संसारातील अडचणी दूर करण्याचे आमिष

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भावाच्या संसारातील अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून जवळीक साधल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तसेच, संबंधित युवतीकडून वेळोवेळी एक लाख रूपये घेतल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

- Advertisement -

या प्रकरणी अमन ऊर्फ सचिन वैरागी (रा. छत्रपती संभाजीनगर, हल्ली मुक्काम इंदूर, मध्यप्रदेश) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळच्या तेलंगवाडी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील व सध्या केडगावात (अहिल्यानगर) राहणार्‍या 23 वर्षीय युवतीने बुधवारी (21 ऑक्टोबर) फिर्याद दिली आहे. 2025 मधील नवरात्रोत्सवापासून ते मे 2026 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादी युवती केडगाव येथे घरी असताना तसेच पुणे बसस्थानक, सावेडी येथील हॉटेल, छत्रपती संभाजीनगर येथील सिंग रेसिडेन्सी आणि अहिल्यानगरमधील हॉटेल रेडियन्स येथे वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संशयित आरोपीने युवतीच्या भावाच्या संसारातील अडचणी दूर करण्याचे कारण सांगून तिच्याशी जवळीक साधल्याचा आरोप आहे. त्यानंतर फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तसेच, तिच्याकडून वेळोवेळी एक लाख रूपये घेतल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अत्याचार तसेच जादूटोणाविरोधी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणूक; 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. सहकाराच्या माध्यमातून राजकीय वर्चस्व टिकविण्याची धडपड, नेत्यांमधील मतभेद आणि पडद्यामागील...