Saturday, March 29, 2025
HomeनाशिकNashik Crime News : मालमत्तेच्या वादातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

Nashik Crime News : मालमत्तेच्या वादातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

उपनगर पोलीस स्टेशनच्या (Upnagar Police Station) हद्दीत असलेल्या रामदास स्वामीनगर येथील मानस अपार्टमेंट बिल्डिंग नंबर एकमध्ये मालमत्तेच्या वादातून दोन भावांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन संतप्त झालेल्या लहान भावाने मोठ्या भावाला बेदम मारहाण केली व धारदार वस्तूने आणि दगडी वरवंटा टाकून मोठ्या भावाचा खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून घटनेप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, रामदास स्वामीनगर येथील मानस अपार्टमेंट बिल्डिंग नंबर १ येथे रहिवासी असलेले दोघे भाऊ मयंक चंद्रकांत जाधव आणि त्याचा लहान भाऊ आकाश चंद्रकांत जाधव हे एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. त्या दोघांचे फ्लॅट विक्रीच्या कारणावरून आपसात भांडण झाले. त्यानंतर आज सोमवार (दि.११) रोजी सकाळी अकरा वाजता मयंक याच्या लहान भावाने काहीतरी लोखंडी टोकदार वस्तूने व दगडी वरवंट्याने मारून मयंक याची हत्या केली.

यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब दुकळे, पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस निरीक्षक बाबुराव पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण चौधरी, मंगेश गोळे, श्रेणी पोलीस निरीक्षक सुरेश गवळी, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई राहुल जगताप, पोलीस शिपाई पंकज कर्पे, पोलीस शिपाई सौरभ लोंढे, पोलीस शिपाई संदेश रघतवान, मिलिंद बागुल, मुकेश शिरसागर यांनी धाव घेतली.

दरम्यान, याप्रकरणी मयंक जाधव याचा लहान भाऊ आकाश याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...