Friday, December 6, 2024
Homeनंदुरबारअल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेलेल्या युवकास धुळे जिल्ह्यातून अटक

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेलेल्या युवकास धुळे जिल्ह्यातून अटक

नंदुबार Nandurbar । प्रतिनिधी

सुरत (Surat) येथील अल्पवयीन मुलीला (minor girl) नंदुरबार येथून अपहरण (Abduction) करून पळवून नेलेल्या आरोपीस (Accused) धुळे जिल्ह्यातून अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने (Immoral human trafficking prevention cell) अटक (Arrested) केली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार तालुक्यातील न्याहाली येथे सुरत (Surat) येथुन 16 वर्षाची अल्पवयीन नात (minor girl) सुट्टयांमध्ये आजी-आजोबांकडे आली होती. दि.29 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजे दरम्यान अल्पवयीन मुलीस सुरत येथील अक्षय शिंदे (Akshay Shinde) याने पळवून नेले म्हणून दि.1 डिसेंबर 2020 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी संशयीत आरोपी अक्षय शिंदे रा. सुरत याच्याविरुध्द अपहरणाचा गुन्हा(crime of kidnapping) दाखल केला होता.

सदर गुन्ह्याचा प्रारंभीचा तपास नंदुरबार तालुका पोलीस ठाणे यांच्याकडुन करण्यात येत होता. परंतु गुन्हा दाखल होऊन बराच कालावधी झाल्यानंतर देखील संशयीत आरोपी व अल्पवयीन मुलगी मिळून येत नव्हती म्हणून पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (Superintendent of Police P.R. Patil) यांनी सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा अंतर्गत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाकडे (Immoral human trafficking prevention cell) सोपवला.

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना देवरे (Assistant Inspector of Police Nayana Deore) व त्यांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास केला. सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी अक्षय शिंदे (Suspected accused Akshay Shinde) याच्याविरुद्ध गुजरात राज्यातील सुरत येथे अनेक गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे.

त्यागुन्ह्यांमध्ये फरार आहे. म्हणून श्री.कळमकर यांनी नयना देवरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक (Squad) तयार करुन तात्काळ सुरत येथे रवाना केले. पथकाने संशयीत आरोपी याची संपूर्ण माहिती प्राप्त केली असता तो मुळचा महाराष्ट्रातील असून त्याचे बरेचशे नातेवाईक धुळे, जळगांव, नाशिक जिल्ह्यात राहत असल्याचे समजले.

पथकाने सुरुवातीस जळगांव जिल्ह्यातील कासोदा येथे जावून संशयीत आरोपीच्या नातेवाईकांची माहिती प्राप्त केली. अक्षय शिंदे हा काही दिवसांपूर्वी कासोदा येथे आला होता. थोडे दिवस तेथे वास्तव्य करून तो कुठे निघून गेला याबाबत त्याच्या नातेवाईकांनी निश्चीत माहिती दिली नाही.

पथक (Squad) कासोदा येथे असतांना संशयीत आरोपी धुळे जिल्ह्यातील म्हसदी येथे असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली म्हणून पथकाने तात्काळ म्हसदी ता.साक्री गाठून सुरुवातीला म्हसदी येथील धनदाई देवी मंदीर परीसरात व संशयीत आरोपीच्या नातेवाईकांची स्थानिक लोकांच्या मदतीने माहिती (Information) काढली व त्यांच्या घराच्या आजुबाजुला वेषांतर करुन सापळा रचला. परंतु संशयीत आरोपी सराईत असल्याने त्यास पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

परंतु पथकाने (Squad) त्यास शिताफीने व गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. संशयीत आरोपी अक्षय सुरेश शिंदे रा. वृंदावन पार्क, सुन्नी गाव, घर नंबर 60, पलसाणा सुरत गुजरात याला अटक केली. पथकाने आरोपीताच्या नातेवाईकाच्या घरातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची (minor girl) सुटका केली व आरोपीतास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी ताब्यात घेतले.

आरोपी व गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगी यांना ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) नंदुरबार येथे आणून आरोपीताबाबत रेकॉर्ड तपासले असता त्याच्यावर सुरत शहर व सुरत ग्रामीण येथे एकुण 24 गुन्हे दाखल असून 16 गुन्ह्यात तो फरार आहे. आरोपीतावर गुजरात राज्यातील कडोदरा पोलीस ठाणे येथे 2 खूनाचे , उमरा व कडोदरा येथे 2 गंभीर दुखापत करुन जबरी चोरी करणे तसेच पलसाण, लिंबायत, दिंडोली, अडाजण, सरथाना, जहांगीरपूरा, उमरा पोलीस ठाणे येथे चोरीचे 20 गुन्हे दाखल (Crime filed) आहेत.

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या (Immoral human trafficking prevention cell) पथकाचे पोलीस अधीक्षक पी. आर . पाटील यांनी अभिनंदन करुन पथकास विशेष रोख बक्षीस जाहीर केले आहे. अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीची सुखरुप सुटका केल्याबद्दल नंदुरबार पोलीसांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहे.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक भगवान धात्रक, महिला पोलीस नाईक अरुणा मावची, दादाभाई मासुळ, पोलीस अंमलदार दिपक न्हावी, पोलीस नाईक मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या