Saturday, June 15, 2024
Homeनगरयुवकावर धारदार हत्याराने हल्ला

युवकावर धारदार हत्याराने हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

दुचाकीवरून प्रवास करणार्‍या युवकाला रस्त्यात आडवून त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 5) रात्री 11 वाजता नागापुरातील लामखेडे चौकात घडली. विनोद राजेंद्र तिजोरे (वय 24 रा. शासकीय दूध डेअरी जवळ, शेंडी बायपास, ता. नगर) असे जखमी युवकाचे नाव आहे.

त्यांनी बुधवारी (दि. 6) दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिजोरे हे मंगळवारी रात्री त्यांच्या दुचाकीवरून नागापूरच्या लामखेडे चौकातून जात असताना त्यांना दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी अडवले. दुचाकीला लाथ मारून खाली पाडले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धारदार हत्याराने पाठीवर वार केले. शिवीगाळ करत,‘तू परत लामखेडे चौकाकडे आला तर तुला जिवंत सोडणार नाही’, असे म्हणून धमकी दिली. मारहाण करणार्‍या चौघांनी तोंडाला कापड बांधले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस अंमलदार बंडू भागवत करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या