Wednesday, June 17, 2026
Homeक्राईमCrime News : तरूणावर कोयत्यासदृश हत्याराने हल्ला

Crime News : तरूणावर कोयत्यासदृश हत्याराने हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील लालटाकी परिसरात असलेल्या अनिता वाईन शॉपसमोर एका तरूणावर चार अनोळखी इसमांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कोयत्यासदृश लोखंडी वस्तूने हल्ला केल्याची घटना सोमवारी (25 मे) रात्री 11:15 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जखमी रोहित बबन शिंदे (वय 27, रा. वारूळाचा मारूती, नालेगाव) यांनी मंगळवारी (26 मे) पहाटे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रोहित शिंदे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास ते त्यांचा मित्र करण माळी यांच्यासोबत जात होते. त्यावेळी त्यांचा मुलगा विशाल मागे राहिल्याने दोघेही लालटाकी परिसरातील अनिता वाईन शॉपसमोर थांबले होते. याचदरम्यान दुचाकीवरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी तुम्ही येथे का थांबले आहात, मी तुम्हाला दाखवतोच, असे म्हणत त्यांच्याशी हुज्जत घातली.

यानंतर संबंधित इसमांनी रोहित शिंदे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एका इसमाने हातातील कोयत्यासारख्या लोखंडी वस्तूने वार केला. या हल्ल्यात शिंदे जखमी झाले आहेत. घटनेनंतर जखमी अवस्थेत रोहित शिंदे व त्यांचा मित्र करण माळी यांनी रूग्णालयात उपचार घेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. महिला पोलीस अंमलदार गडाख अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Newasa : नेवासा-श्रीरामपूर राज्यमार्गावर कारने घेतला पेट

0
पाचेगाव फाटा |वार्ताहर| Pachegaon Phata चालत्या किंवा उभ्या चारचाकी गाड्या पेटण्याच्या वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. शॉर्टसर्किट, इंधन गळती किंवा अपघातामुळे गाड्यांना अचानक आग लागल्याचे...