Wednesday, May 14, 2025
Homeक्राईमCrime News : दोघांकडून तरुणाला विळद घाटात मारहाण

Crime News : दोघांकडून तरुणाला विळद घाटात मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

विळद घाट (ता. अहिल्यानगर) परिसरात आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका तरुणाला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. जगदीश पांडुरंग चव्हाण (वय 38 रा. विळद घाट, ता. अहिल्यानगर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

ही घटना सोमवारी (12 मे) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. जगदीश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम ईश्वर साळुंके (रा. निंबळक, ता. अहिल्यानगर) व अनोळखी इसम यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी ओम साळुंके याने तु माझ्या वडिलांचे घेतलेले पैसे कधी देतोस या कारणावरून फिर्यादीस शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने पोटावर व पाठीवर मारहाण केली. त्याचप्रमाणे त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी इसमाने देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी फिर्यादीसोबत असलेल्या त्यांच्या पत्नी मोहिणी यांनाही संशयित आरोपीने शिवीगाळ व मारहाण केली, तसेच दोघांनाही जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. हा प्रकार घडल्यानंतर जगदीश यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार चौधरी करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अंगावर दगड पडून चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar खेळत असताना चार वर्षांचा चिमुकल्याचा अंगावर दगड पडून त्यात त्याचा मृत्यू झाला. सार्थक नवनाथ गोलवड (रा. शिराढोण, ता. अहिल्यानगर) असे मयत चिमुकल्याचे...