Saturday, May 25, 2024
Homeनगरयुवकाला एमआयडीसीत मारहाण

युवकाला एमआयडीसीत मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कंपनीत ड्यूटीवर निघालेल्या युवकाला एकाने धातूच्या कड्याने मारहाण केल्याची घटना 23 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता एमआयडीसीतील पारस कंपनीजवळ घडली. संकेत बंडू पवार (वय 20) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांनी 24 सप्टेंबर रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अमित चंद्रकांत शिंदे (रा. चौभे कॉलनी, गांधीनगर, बोल्हेगाव) याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

23 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता संकेत पवार हे कंपनीत ड्युटीवर चालले असता एमआयडीसीतील पारस कंपनी जवळ अमित शिंदे उभा होता. त्याने संकेत यांना गाडी थांबविण्यास सांगितली. तेव्हा संकेत त्यांना म्हणाले, मी का गाडी थांबायची?असे म्हणताच अमित शिंदे याला राग आला. त्याने संकेत यांना मारहाण केली. पुन्हा या रस्त्याने आल्यास हात पाय तोडून टाकीन, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या