Tuesday, March 25, 2025
Homeक्राईममारहाण करत तरूणाला आर्मी एरियात लुटले

मारहाण करत तरूणाला आर्मी एरियात लुटले

दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माळीवाडा (Maliwada) भागात जेवण करण्यासाठी थांबलेल्या तरूणाला नगर-जामखेड रस्त्याने आर्मी एरियामध्ये (Nagar-Jamkhed Road Army Area) घेऊन जात मारहाण करण्यात आली. त्याच्याकडील मोबाईल, सॅक बळजबरीने हिसकावली. मारहाणीत (Beating) तरूण जखमी झाला आहे. अनिल गोरख हाडे (वय 29 रा. महिंदा, ता. जि. बीड) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांनी रविवारी (21 जुलै) दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) अनोळखी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अनिल 13 जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता माळीवाडा (Maliwada) येथील एका हातगाडीवरती जेवण करण्याकरीता थांबले होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती तेथे आले व त्यांनी अनिल यांना त्यांच्या दुचाकीवर बळजबरीने बसवून चांदणी चौकातून जामखेड रस्त्याला आर्मी एरियामध्ये नेले. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लोखंडी टणक वस्तूने मारहाण करून जखमी (Injured) केले. अनिल यांचा मोबाईल व सॅक बळजबरीने काढून घेतली. सॅकमध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम व चेकबुक, तसेच अ‍ॅक्सेस बँकेचे पासबुक होते.

दरम्यान, त्या दोन चोरट्यांनी अनिल यांच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम कार्डचा (ATM Card) वापर करून रोख रक्कम काढली व वेगवेगळ्या दुकानातून काही वस्तूंची खरेदी केली. रोख स्वरूपात व खरेदी असे मिळून एक लाख 44 हजार रूपये एटीएमचा वापर करून काढून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...