Thursday, March 13, 2025
Homeक्राईमशिवजयंती मिरवणुकीत युवकावर ब्लेडने वार

शिवजयंती मिरवणुकीत युवकावर ब्लेडने वार

चौघांविरूध्द कोतवालीत गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरात शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान एका युवकावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तनिष उमेश गायकवाड (वय 19 रा. गवळीवाडा, भिंगार) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याने दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कार्तिक शेलार, आदित्य पवार व कृष्णा कांबळे (पूर्ण नावे माहिती नाही, तिघे रा. भिंगार) व अनोळखी यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. तनिष हा डीजे लाईटच्या व्यवसायात कार्यरत आहे. शिवजयंतीच्या दिवशी, (19 फेब्रुवारी) तो अभिजीत धाडगे (रा. नागरदेवळे, ता. नगर) यांच्या मालकीच्या डीजेवर लाईट काम करीत होता. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीत माणिक चौक येथे तो लाईट सेटिंगचे काम पूर्ण करून खाली उतरला. तेव्हा अचानक कृष्णा कांबळे, आदित्य पवार, कार्तिक शेलार व त्यांच्या सोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्याला अडवले. त्यावेळी कार्तिक शेलारच्या हातात ब्लेड होते.

अचानक कृष्णा कांबळे व आदित्य पवार यांनी तनिषला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याने प्रतिकार केला असता कोणतेही कारण न सांगता शिवीगाळ करून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर कार्तिक शेलारने ब्लेडने तनिषच्या पोटावर वार केले. यावेळी तनिषचा मित्र सिध्दार्थ हुशारे (रा. गणेशनगर, नेप्ती रस्ता, अहिल्यानगर) यालाही मारहाण करण्यात आली. आरडाओरड केल्याने संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच तनिषच्या नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व तनिषला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...