Saturday, April 26, 2025
Homeधुळेशस्त्र तस्करीच्या रॅकेटमध्ये गुरफटली तरुणाई

शस्त्र तस्करीच्या रॅकेटमध्ये गुरफटली तरुणाई

धुळे dhule । राम निकुंभ

आकर्षण, हौसेसह दहशत माजविणे, आपला दबदबा, वट निर्माण करण्यासह आपापसातील खुन्नस काढण्यासाठी गावठी कट्टा, घातक शस्त्रांचा सर्रासपणे वापर होत आहे. जिल्ह्यात दाखल विविध गुन्ह्यांमधून ही बाब लक्षात येते. जिल्ह्यात मागील तेरा महिन्यात पोलिसांकडून 65 गुन्हेगारांना गजाआड केले. त्यांच्याकडून 51 गावठी कट्टे, 71 जिवंत काडतुसे जप्त केले. तसेच 36 आरोपींकडून 120 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या आरोपीमध्ये सर्वाधिक तरुणांचा (Youth) समावेश आहे. त्यामुळे तरुणाई शस्त्र तस्करीच्या (arms smuggling racket) रॅकेटमध्ये गुरफटलेली दिसून येत आहे. यातील पिस्तूल एमपीतुन येत असल्याचे तपासात समोर आले आहे. परंतु एमपीच्या बॉण्ड्रीपर्यंत हा तपास थांबत आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यात खून, हाणामार्‍या, वादावादीच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्यास आपले वर्चस्व सिद्ध करण्यासह विविध कारणे आहेत. या घटनामध्ये कट्टयांसह घातक हत्यारांचाही वापर झाला आहे. त्यामुळे गावठी कट्टे व हत्यारे अगदीच सहज उपलब्ध होत आहेत. जिल्ह्याला गुजरात, मध्यप्रदेशची सीमा असल्याने कट्टा तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. गुंडांच्या टोळ्या यातून वाढीस लागल्या आहेत. याच तस्करीतून संघटीत गुन्हेगारी वाढत असून, गावठी कट्ट्यांचा वापरही वाढत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणेकडून तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु आहे. शस्त्र तस्करांवर पोलिसांची बारीक नजर आहे. गेल्या 13 महिन्यात जिल्ह्याभरात पोलिसांनी 37 गुन्ह्यांमध्ये 65 आरोपी निष्पन्न केले असून 44 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 51 गावठी कट्टे (पिस्तूल) व 71 काडतुसे जप्त केले आहेत. तसेच वाहने असा 32 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबरोबरच 22 गुन्ह्यात अवैधपणे हत्यारे बाळगणारे 36 आरोपी निष्पन्न झाले असून 31 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 120 तलवारींसह विविध हत्यारे जप्त करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांची कारवाई सुरू असली, तरी जिल्ह्यात कट्टे येण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. पिस्तूल खरेदी विक्री व्यवहारातील मूळ सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र शहरासह जिल्ह्यात कोणासाठी आणली होती. याचे खरेदीदार कोण, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तसेच याचा वापर कशासाठी करण्यात येणार होता हेही शोधणे गरजेचे आहे.

पोलिसांनी कारवाई करुन अटक केलेल्या आरोपींच्या चौकशी व तपासादरम्यान जिल्ह्यात मध्यप्रदेशातील उमरठी गावातून या कट्ट्यांचा पुरवठा होत असल्याचेही समोर आले आहे. मात्र, तिथपर्यंतच हा तपास थांबत आहे.

अतिदुर्गम भाग आणि परराज्य असल्याने कारवाईत अडथळे येत असल्याने तस्कारांच्या मुसक्या आवळण्यात अडचणी येत असल्याचे सुत्रांनी सांगितले. घातक शस्त्र बाळगण्याची कारणे- आकर्षण किंवा हौस म्हणून गावठी कट्टा (पिस्तूल) बाळगण्याचे फॅड, गंभीर गुन्हा करण्यासाठी, दादागिरी, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी, गुन्हेगारांना विक्री करण्यासाठी, अशी अनेक कारणे पोलीस तपासात समोर आली आहेत.

मागील 13 महिन्यात खूनाच्या 2 गुन्ह्यांमध्ये अग्निशास्त्र वापरा संबंधीचे दोन गुन्हे घडले आहेत. ते उघडही झाले आहे. जबरी चोरीच्या एका गुन्ह्यातही अग्नीशास्त्राचा वापर झाला आहे.

पोलिसांचे बारीक लक्ष कमी पैशात उपलब्ध होत असल्यामुळे अवैध शस्त्रे बाळगणारे वाढले आहे. दाखल गुन्ह्यामधून हीबाब लक्षात येते. परंतू गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच आहे. त्यामुळे कोणीही अवैधशस्त्रे बाळगु नये. वाढदिवस व इतर उत्सवांमध्येही हत्यारे मिरवू नये. केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करू नये. ऑनलाईन पध्दतीने शोभेची तलवारही मागावू नये. तरीही कारवाई केली जाईल. याबरोबरच ज्यांच्याकडे अग्निशस्त्राचा परवाना आहे, त्यांनी देखील विनाकारण त्याचे प्रदर्शन करू नये. संरक्षणासाठीच त्याचा वापर करावा.

किशोर काळे, अपर पोलिस अधिक्षक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; सरकारचा...

0
दिल्ली । Delhi जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच पर्यटकांना टार्गेट केलंय. मानवतेला काळिमा...