Friday, November 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसप्तशृंगी गडाच्या शितकड्यावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

सप्तशृंगी गडाच्या शितकड्यावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

ओझे l वार्ताहर

- Advertisement -

सप्तशृंगी गडावरील शितकड्यावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राहुल भाऊराव सावळे (वय २७, रा. जामशेत, ता. कळवण, जि. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवार (दि. ६) रोजी सकाळी सुमारे १० वाजता भातोडे शिवारातील फॉरेस्ट जंगल परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

वणी पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, राहुल हा मागील सुमारे १५ दिवसांपासून घराबाहेर होता. कौटुंबिक कारणांमुळे तो घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबीय त्याच्या संपर्कात होते. गुरुवारी (दि. ५) त्याचा मित्र धर्मराज दौलत बागुल याने फोन करून राहुल सप्तशृंगी गडावर आल्याची माहिती दिली होती. मित्राने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तो काहीही न ऐकता तेथून निघून गेला. दरम्यान, सप्तशृंगी गड परिसरातील नागरिकांनी एक तरुण शितकड्याकडे जाताना पाहिल्याची माहिती मिळाली.

रात्री उशिरापर्यंत राहुलचा शोध घेण्यात आला; मात्र तो आढळून आला नाही. शुक्रवारी सकाळी कुटुंबीयांनी शेतकऱ्यांच्या पायवाटेने भातोडे शिवारातील फॉरेस्ट जंगल परिसरात शोध घेतला असता राहुल गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या हातापायांसह डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला खासगी रुग्णवाहिकेतून वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी आवश्यक कार्यवाही केली असून, अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, राहुलने सप्तशृंगी गडावरील शितकड्यावरून उडी मारल्याचा संशय व्यक्त होत आहे. मृत्यूच्या नेमक्या परिस्थितीबाबत पोलिस तपासातून अधिक स्पष्टता येणार आहे.

ताज्या बातम्या

Accident : ट्रॅक्टर पलटी होऊन युवकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

0
ओझे l वार्ताहर Oze ऐन सणासुदीच्या काळात रस्त्यांच्या कामातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अहिवंतवाडी येथून टोमॅटो भरून खोरीफाटा येथील बाजारपेठेत विक्रीसाठी जाणारा ट्रॅक्टर...