Friday, May 31, 2024
HomeनाशिकNashik News : कर्जाला कंटाळून युवकाची आत्महत्या

Nashik News : कर्जाला कंटाळून युवकाची आत्महत्या

पालखेड मिरचीचे | वार्ताहर | Palkhed Mirchiche

येथील किशोर बाबुराव पठाडे (४५) या तरूण युवकाने (Youth) आपल्या राहत्या घरात छताला दोरी बांधून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पिंपळगांव बसवंत पोलिस ठाण्यात (Pimpalgaon Baswant Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे…

- Advertisement -

नांदगाव तालुक्यात मोठी कारवाई; देहव्रिक्री रॅकेटचा पर्दाफाश

याबाबत अधिक माहिती अशी की, दिवसेंदिवस वाढणारी महागाई (inflation) त्यातच उदरनिर्वाहचे साधन जेमतेम असल्याने संबधित कुटुंबाचे पालनपोषण करणे शक्य होत नव्हते. तसेच दैनंदिन गरजा भागवितांना कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने सदर युवक वैफल्यग्रस्त झाला होता. त्यामुळे या युवकाने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. या युवकाने कौटुंबिक गरजा भागत नसल्याने त्या गरजा भागविण्यासाठी त्याने नातेवाईक व मित्रांकडून हातउसने पैसै (Money) घेतले होते. मात्र, हे पैसे तो वेळेवर परतफेड करू शकत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

Maratha Reservation : ” ‘माझा आवाज चालू आहे, तोपर्यंत…”; मनोज जरांगे पाटलांचे सरकारला आवाहन

किशोरने पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. अतिशय हुशार असणाऱ्या या युवकाने आपली जीवनयात्रा संपविल्याने पालखेड परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. ऐन उमेदीच्या काळात किशोरने हा निर्णय घेतल्याने त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. किशोरच्या पश्चात वृद्ध आई, भाऊ, बहिण, पत्नी,नऊ वर्षाचा मुलगा,आठ वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Fire News : लासलगाव येथे कॉम्प्लेक्सला भीषण आग; लाखोंचे नुकसान

- Advertisment -

ताज्या बातम्या