Saturday, July 27, 2024
Homeनगरविहीरीत युवकाचा मृतदेह आढळला

विहीरीत युवकाचा मृतदेह आढळला

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले (Akole) शहरातील शाहूनगर येथील मयूर आण्णासाहेब पवार (वय 21) या तरुणाचा मृतदेह (Youth Deadbody) शनिवारी दुपारी शेटे मळ्याकडे जाणार्‍या रस्त्याच्या लेंडी नाल्याच्या बाजूला असलेल्या बांधकाम केलेल्या खोल विहिरीत (Well) आढळला. त्याचा घातपात झाला की त्याने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

भंडारदरा पुन्हा तुडूंब; आवक कायम

गुरुवार दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी दूपारपासून आपल्या राहत्या घरातून मयुर पवार बेपत्ता (Missing) झाला होता. अकोले पोलीस ठाण्यात (Akole Police Station) बेपत्ता नोंद दाखल करण्यात आली होती. यानंतर अकोले पोलीस व त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. दरम्यान त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मयूर पवार हा तरुण नुकताच सीआरपीएफ मध्ये भरती झाला होता. 15 सप्टेंबर रोजी तो दिल्ली ह्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी जाणार होता. ट्रेनिंगला जाण्यासाठी त्याची तयारी सुरु होती. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला लागणार्‍या सर्व वस्तू आणून देखील दिल्या होत्या. गुरुवारी दुपारी दिड वाजल्याच्या सुमारास मयुरने मी गावात माझ्या मित्राचा मोबाइल दुरुस्त करण्यासाठी जात आहे, असे सांगून तो घराबाहेर पडला होता.

पाच लाखांच्या मोफत उपचारांसाठी 3 लाख 73 हजार लाभार्थी वाढले

मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी त्याला मोबाइलद्वारे संपर्क साधला असता मोबाइल बंद आला. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला असता मयूर मिळून आला नाही. त्यामुळे अकोले पोलीस ठाण्यात (Akole Police Station) मयूरची आई गायत्री आण्णासाहेब पवार यांनी मयुर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी स्वतः ह्या प्रकरणात लक्ष घातले होते. दरम्यान शनिवारी 100 फूट खोल असलेल्या बांधकाम केलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

अत्यंत निर्जन असलेल्या या भागात ही विहीर (Well) आहे. त्याचा मृतदेह (Dead Body) अकोले पोलिसांनी विहिरीतून बाहेर काढला व तो शवविच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अकोले येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. शांत स्वभावाचा असणार्‍या मयुर पवारच्या दुदैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

11 हजार लिटर दूध, 509 किलो दही नष्ट

- Advertisment -

ताज्या बातम्या