Tuesday, January 27, 2026
Homeक्राईमRahuri : कनगर येथे उक्कलगावच्या तरूणाचा मृतदेह आढळला

Rahuri : कनगर येथे उक्कलगावच्या तरूणाचा मृतदेह आढळला

मयताच्या पत्नीसह दोघांवर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील कनगर परिसरात वन विभागाच्या हद्दीत शुक्रवार दि. 23 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास एका 40 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. सुधाकर किसन थोरात, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर असे मयत व्यक्तीचे नाव असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात मयताची पत्नी व एका इसमावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, राहरी तालुक्यातीन कनगर येथील वनविभागाच्या हद्दीत एका 40 वर्षीय इसमाचा मृतदेह बेवारस पडल्याची माहिती राहुरी पोलीसांना मिळाली.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सुधाकर थोरात यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या बाबत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र सदर इसमाचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच मयताची पत्नी अनिता थोरात व तीचा कथित प्रियकर ज्ञानेश्वर सागर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत सुधाकर थोरात यांचे मामा जनार्दन बाळाजी दिघे, रा. धानोरे ता. राहुरी यांनी राहुरी पोलीस ठण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, माझा भाचा सुधाकर किसन थोरात रा. उक्कलगाव ता. श्रीरामपुर हा नेवासा तालुक्यातील उस्थळ येथे एका हॉटेलमध्ये कामाला होता. तसेच त्याची पत्नी अनिता थोरात व ज्ञानदेव सागर रा. बिरेवाडी ता. संगमनेर यांचे प्रेमसंबंध असल्याचे मला माझा भाचा सुधाकर थोरात याने सांगीतले होते. व ज्ञानदेव सागर याने माझा भाचा सुधाकर यास ‘तू तुझ्या पत्नीस सोडुन दे, तिचे व माझे प्रेमसंबंध असुन तू तिला सोडले नाही तर आम्ही दोघे मिळून तुला जिवे ठार मारुन टाकू’ अशी धमकी माझे समोर दिली होती.

YouTube video player

दि.22 जानेवारी 2026 रोजी माझा भाचा सुधाकर थोरात हा नेहमीप्रमाणे सकाळी कामाला असताना त्याला माझा मुलगा बाबासाहेब दिघे याचे फोनवरुन तो कोठे आहे, याबाबत दुपारी विचारपूस केली असता सुधाकर याने त्याला सांगीतले की, तो औषधोपचारासाठी त्याच्या मित्रासोबत जात आहे. त्यानंतर माझ्या मुलाने त्याला वेळोवेळी तब्येतीबाबत विचारपूस करण्याकरीता फोन केला असता, त्याचा मोबाईल बंद मिळून आला. त्यानंतर त्याने सुधाकर थोरात याची पत्नी अनिता हिस मोबाईलवर संपर्क केला असता तिने सांगीतले की, तिचा नवरा सुधाकर हा वंरशिंदे ता राहुरी येथे बहीणीकडे गेला आहे.

त्यानंतर दि. 23 जानेवारी रोजी सांयकाळी समजले की, सुधाकर याचे प्रेत कनगर ता. राहुरी शिवारात जंगलामध्ये मिळुन आले आहे. म्हणून मी राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात येऊन सुधाकरचे प्रेत पाहीले असता, त्याचे गळ्यावर काळा व्रण दिसून आला. तेव्हा आमची खात्री झाली की, सुधाकर यास त्याची पत्नी अनिता थोरात व ज्ञानदेव तुकाराम सागर या दोघांनी मिळून कट कारस्थान करुन त्याचा गळा आवळून जिवे ठार मारले. जनार्दन बाळाजी दिघे, रा. धानोरे ता. राहुरी यांच्या फिर्यादीवरून पत्नी अनिता सुधाकर थोरात रा. उक्कलगाव ता. श्रीरामपूर व ज्ञानदेव तुकाराम सागर रा. बिरेवाडी ता. संगमनेर या दोघांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(2), 61(2), 3 (5) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...