Sunday, June 23, 2024
Homeनाशिकमालेगाव : राजमाने शिवारात वीज पडून युवक ठार

मालेगाव : राजमाने शिवारात वीज पडून युवक ठार

मालेगाव । Malegaon

- Advertisement -

तालुक्यातील राजमाने शिवारात अंगावर वीज पडल्याने प्रविण कैलास सोनवणे (18) हा युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

गत चार-पाच दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे खरीप हंगामातील बाजरी, मका आदी पिकांसह नव्याने लागवड केलेल्या कांदा पिकाची अतोनात हानी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने प्रविण सोनवणे जागीच ठार झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या