लासलगाव | वार्ताहर Lasalgaon
मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून नातेवाईकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी छेड काढणाऱ्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लासलगाव रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून कुंदन चावरिया असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी मनमाड रेल्वे पोलिस ठाण्यात ५ आरोंपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस अधीक्षक स्वाती भोर, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस उप अधिक्षक के. के. पाटील यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी मयत तरुणाच्या नातेवाईकांनी पोलिसांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. दरम्यान, उर्वरित फरार आरोपींना तातडीनं अटक करण्यात यावी यासाठी उद्या लासलगाव बंदची हाक देण्यात आली आहे.
सायंकाळी पाच वाजता मृतदेह लासलगाव येथे आणण्यात आला शोकाकुल मित्र आणि नातेवाईक यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली . पार्थिवावर पोलिस बंदोबस्तात अत्यसंस्कार करण्यात आले.




