Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजधरणात बुडून युवकाचा मृत्यू

धरणात बुडून युवकाचा मृत्यू

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून, धरणात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सार्थक माणिक पताडे (वय २०) असे मृत युवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, त्याची भारतीय सैन्यात नुकतीच निवड झाली होती, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाऊर येथील शेतकरी माणिक मधुकर पताडे यांचा मुलगा सार्थक हा सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास धरणात मोटरपंप सोडण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला आणि दुर्दैवाने बुडून त्याचा मृत्यू झाला.

या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक होतकरू युवक गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुलाब पवार करत आहेत.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...