Sunday, September 15, 2024
Homeजळगावलोणी येथे तरुणाचा विहिरीत पडल्याने मृत्यू

लोणी येथे तरुणाचा विहिरीत पडल्याने मृत्यू

पारोळा Parola (प्रतिनिधी)

- Advertisement -

तालुक्यातील लोणी खुर्द (Loni) गावाजवळील महादेव मंदिर जवळील विहिरीतून पाणी काढत (Drawing water from a well)असताना समाधान शांताराम पाटील वय 26 यांच्या पाय घसरून (Slipped feet) विहिरीत पडून (Falling into a well) पाण्यात बुडून मरण (Death by drowning) पावल्याची घटना आज 27 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत समाधान सुरेश पाटील यांनी पारोळा पोलिसात खबर दिली. 27 रोजी दुपारी 2.30 वाजेचे सुमारास त्यांना स्वप्नील निंबा पाटील यांचा फोन आला की, समाधान शांताराम पाटील हे लोणी खुर्द गावाजवळील महादेव मंदीर जवळ असलेल्या विहीरीतून पाणी काढत असतांना पाय घसरल्याने विहीरीत पडला असल्याचे.

त्यानुसार लोणी खुर्द गावातील दत्तु गोपीचंद पाटील, भालचंद्र बाबुलाल पाटील, तुषार दगा पाटील, केशव दयाराम पाटील, संजय यशवंत पाटील असे विहीरीवर जावुन विहीरीत बिलायची टाकुन खाटीच्या सहाय्याने समाधान पाटील यास विहीरीेच्या बाहेर काढले.

त्यांस खाजगी वाहनामध्ये मध्ये टाकुन कुटिर रुग्णालय पारोळा येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनीं तपासुन मयत घोषित केले. पारोळा पोलीस स्टेशनला खबर दिल्या वरुन अकस्मात मृत्यु दाखल असून पुढील तपास पोलिस विनोद साळी हे करीत आहेत .

- Advertisment -

ताज्या बातम्या