Saturday, May 18, 2024
Homeधुळेविजेचा धक्का लागून तरूणाचा मृत्यू

विजेचा धक्का लागून तरूणाचा मृत्यू

निजामपूर । वार्ताहर

साक्री तालुक्यातील टिटाणे येथे विजेचा धक्का लागून तरूणाचा मृत्यू झाला. पवन ऊर्जा कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच तरूणाचा जिव गेल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

- Advertisement -

भुर्‍या श्रावण बागुल (वय 28 रा.टिटाणे ता.साक्री) असे मयत तरूणाचे नाव आहे. दरम्यान कंपनीकडून पवन ऊर्जेचा एक टॉवर पाडण्यात आला. त्याचे तार लोखंड व इतर साहित्य तेथेच पडलेले होते. तसेच त्या टॉवरवरील तारेचा प्रवाह देखील सुरूच ठेवण्यात आला होता. त्या तारेचा स्पर्श लागून तरूणाचा मृत्यू झाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी गर्दी करीत संबंधीत पवन उर्जा कंपनीच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या