Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : कार अपघातात तरुणाचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

Nashik News : कार अपघातात तरुणाचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक–गिरणारे रस्त्यावरील ‘गंमत जंमत’ हॉटेलजवळील भीषण कार अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

मृत तरुणाचे नाव शंतनू जयंत बुऱ्हाडे (रा. जेलरोड, नाशिक) असे असून तो उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत होता. दोन दिवसांपूर्वीच तो घरी परतला होता. शनिवारी दुपारी तो दोन मित्रांसह गंगापूर धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. परतीच्या प्रवासात कारवरील (एमएच ४६ झेड ००६७) नियंत्रण सुटल्याने वाहन अनेक वेळा उलटून रस्त्याकडेला झाडावर जाऊन आदळले. अपघातात कारचा पूर्ण चुराडा झाला.

शंतनू हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या पुलाजवळ वारंवार अपघात होत असल्याने तो धोकादायक ‘ब्लॅकस्पॉट’ ठरत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...