Wednesday, June 19, 2024
HomeनाशिकNashik News : बिबट्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू

Nashik News : बिबट्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू

पेठ | प्रतिनिधी | Peth

- Advertisement -

तालुक्यातील हरणगाव शिवारात (Harangaon Shivar) जनावरे (Animals) चारण्यासाठी जात असतांना उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leopard) एका युवकावर हल्ला केल्याने त्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे…

नाशकात खुनाचे सत्र सुरूच; किरकोळ वादातून युवकाची हत्या

याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र वामन गावित (३३) असे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास सदर तरुण जवळच्या जंगलात जनावरे चारण्यासाठी घेऊन जात असतांना लगतच्या उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत त्याला जखमी करून जंगलात ओढून नेले.

Uddhav Thackeray : “मी फडतूस म्हणणार नाही, कलंक म्हणणार नाही, थापाड्याही…”; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं

त्यानंतर ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला असता दुपारच्या सुमारास रविंद्रचा मृतदेह (Dead Body) विचित्र अवस्थेत आढळून आला. यावेळी बिबट्याने मयत रविंद्रचा खांदा, गळा आणि मांडी फाडल्याचे ग्रामस्थांच्या निर्दशनास आले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात (Peth Rural Hospital) नेण्यात आला.

Eknath Shinde : “…अन् एका झटक्यात ऑनलाइनवाले लाईनवर आणले”; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

दरम्यान, याप्रकरणी पोलीस (Police) पंचनाम्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने (Forest Department) पिंजरा (Cage) लावावा अशी मागणी केली आहे .

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

India Alliance : ‘इंडिया’ आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? मुंबईतील बैठकीआधी कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याने दिली महत्त्वाची माहिती

- Advertisment -

ताज्या बातम्या