Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकपोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

ओझे l वार्ताहर OZE

दिंडोरी तालुक्यातील करंजवण येथील अजय शिवाजी मोरे( वय२४) हा युवक सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास करंजवन धरणात पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

- Advertisement -

अजय मोरे हा युवक करंजवण धरणात पोहण्यासाठी गेला होता मात्र तो दूरवर जात त्याला परत येताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात दमछाक होऊन तो पाण्यात बुडाला. नातेवाईकांनी धावपळ करून त्याला बाहेर काढत त्वरित दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र त्यांचे नाका तोंडात पाणी गेल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...