Monday, June 24, 2024
Homeक्राईमतरुणावर चाकूने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तरुणावर चाकूने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

गाडीचा ब्रेक दाबल्यामुळे झालेल्या आवाजाच्या कारणावरून तरूणावर चाकूने हल्ला झाल्याची घटना जोर्वे (ता.संगमनेर) येथे 31 मे रोजी घडली. संगमनेर तालुका पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संकेत शिवाजी गिरी व प्रसाद राजेंद्र दिघे हे आपल्या मोटरसायकलवरून संगमनेरवरून जोर्वेकडे जात होते. गावठाण येथे ते आले असता त्यांच्या गाडीच्या मागे कुत्रे लागल्याने त्यांनी गाडी जोरात चालवली. गावठाण बसस्थानकाजवळ गतिरोधक असल्याने त्यांनी गाडीचा ब्रेक अचानक दाबला. यामुळे गाडीचा जोराचा आवाज झाला.

यावेळी कट्टयावर बसलेले प्रमोद महिपत इंगळे, अशोक अनाजी वाकचौरे, बबन सुखदेव खैरे (सर्व रा. जोर्वे) यांनी दोघांना शिवीगाळ केली. गतिरोधक असल्याने अचानक ब्रेक दाबल्याने गाडीचा आवाज झाला आहे असे सांगूनही त्यांना शिवीगाळ करण्यात आली. यानंतर प्रमोद इंगळे, अशोक वाकचौरे, बबन खैरे, प्रकाश इंगळे, श्रीराम प्रकाश इंगळे हे संकेत याच्या घरासमोर आले. संकेत हा घराच्या बाहेर आला असता या सर्वांनी त्याला शिवीगाळ व दमदाटी केली. या ठिकाणी प्रमोद इंगळे याने त्याच्या हातातील चाकूने पाठीवर तसेच उजव्या दंडावर मारहाण केली.

अशोक वाकचौरे याने छातीत बुक्क्या मारल्या. बबन खैरे याने गळा दाबला. प्रकाश इंगळे याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्यांनी संकेतच्या कंबरेच्या डाव्या बाजूला मारले. याप्रकरणी संकेत शिवाजी गिरी (वय 21, रा. जोर्वे) याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी प्रमोद इंगळे, अशोक वाकचौरे, बबन खैरे, प्रकाश महिपत इंगळे, श्रीराम प्रकाश इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या