Friday, May 31, 2024
Homeनगरतरुणाचा खून करणारे दोघे जेरबंद

तरुणाचा खून करणारे दोघे जेरबंद

राहाता |प्रतिनिधी| Rahata

दि. 8 जुलै 2023 रोजी सुधीर अशोक कांदे (वय 35) रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर यास अनोळखी इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार हत्याराने भोसकून ठार मारून त्याचा मृतदेह पुणतांबा परीसरात रस्त्याच्याकडेला फेकून दिला होता. सदर घटनेबाबत नवनाथ दादासाहेब चौधरी, रा. भैरवनाथ नगर, गोंधवणी, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे.

- Advertisement -

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करून, गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश दिले होते. पो.नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, पो. हे. कॉ. दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे, विजय वेटेकर, देवेंद्र शेलार, पो.ना.रवींद्र कर्डीले, संदीप चव्हाण, फुरकान शेख, पो.कॉ.मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड आदी पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाला गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सूचना दिल्या.

पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून संशयित आरोपी मयुर विजय काळे, (रा. रेणुकानगर सूतगिरणी, ता. श्रीरामपूर), किरण सुरेश काकफळे (वय 24, रा. रमानगर, सूतगिरणी, ता. श्रीरामपूर) यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना अधिक विश्वासात घेवून सखोल व बारकाईने चौकशी करता त्यांनी मयत इसम रस्त्याने पायी जाताना त्यास लिफ्ट देण्याचा बहाण्याने मोटार सायकलवर बसवून निर्जनस्थळी नेऊन लुटण्याच्या उद्देशाने गाडी थांबविली. मात्र त्याने प्रतिकार केल्याने त्याच्या पोटात चाकू मारला. त्यात तो ठार झाला. त्यानंतर त्याचा मोबाईल फोन घेऊन गेलो अशी हकिगत सांगितली. यावरून दोन्ही आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींना राहाता पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास राहाता पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या