Saturday, November 23, 2024
Homeक्राईमव्हिडीओ शुटींग करत असल्याच्या संशयावरून तरूणाचा खून

व्हिडीओ शुटींग करत असल्याच्या संशयावरून तरूणाचा खून

सिमेंटचा ब्लॉक घातला डोक्यात || तिघे ताब्यात, शनिशिंगणापूरचे दोघे पसार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

व्हिडीओ शुटींग करत असल्याच्या संशयावरून दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांनी तरुणाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून त्याचा खून केला. स्टीफन अविनाश मिरपगार (वय 33 रा. आंधळे चौरेनगर, नवनागापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान 4 जून रोजी स्टीफनचा मृतदेह सह्याद्री चौकातील एका पान टपरीजवळ बेवारस मिळून आला होता. एमआयडीसी पोलिसांच्या तपासातून त्याचा खून झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

स्टीफनची पत्नी काजल यांनी 10 जून रोजी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. संग्राम सोन्याबापू कदम (वय 19 रा. तलाठी कार्यालयाजवळ, नागापूर) याला अटक करण्यात आली असून किरण बाळासाहेब गव्हाणे व सोन्या उर्फ गौतम भगवान अंभोरे (दोघे रा. शनिशिंगणापूर ता. नेवासा) हे दोघे पसार झाले आहेत. 4 जून रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास नगर – मनमाड रस्त्यावरील सह्याद्री चौकात एका पान टपरी जवळ एक तरुण बेशुध्द अवस्थेत असल्याचे एमआयडीसी पोलिसांना समजले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या तरुणाला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान सदरचा तरुण स्टीफन मिरपगार असल्याचे समोर आले. एमआयडीसी पोलिसांनी तपासादरम्यान घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, साक्षीदार, गुप्तबातमीदार यांच्याकडे चौकशी केली असता स्टीफनचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. स्टीफन त्याच्या पत्नीसोबत व्हिडीओ कॉलवरून बोलत असताना संशयित आरोपींना तो आपली शुटींग काढत असल्याचा संशय आला. यातून त्यांनी त्याला शिवीगाळ, दमदाटी करून सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून त्याचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक विनोद परदेशी, उपनिरीक्षक भालेराव, पोलीस अंमलदार साबीर शेख, महेश बोरूडे, बंडू भागवत, संदीप चव्हाण, राजेंद्र सुद्रिक, किशोर जाधव, अक्षय रोहकले, नवनाथ दहिफळे, राहुल गुंडू यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या