Thursday, February 5, 2026
Homeक्राईमCrime News : धक्कादायक! काका व चुलत भावाकडून तरुणाची हत्या

Crime News : धक्कादायक! काका व चुलत भावाकडून तरुणाची हत्या

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई-कांगोणी रस्त्यावरील वडघुले वस्ती येथे मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी रात्री जुन्या घरी आल्याच्या कारणावरून चुलता व चुलत भावांनी भावाची हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गणेश दत्तात्रय वडघुले (वय 36) रा. वडघुले वस्ती, कांगोणी रोड, सोनई हा जुन्या घरी आल्याच्या कारणावरून आरोपींनी कोयता, लोखंडी पाईप, शेतीसाठी लागणारे खोरे व लाकडी ठोकळ्याने डोक्यात मारले. यात गणेश वडघुले हा ठार झाला. फिर्यादी हे त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले असल्याची फिर्याद हिराबाई दत्तात्रय वडघुले (वय 60) रा. वडघुले वस्ती यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली.

YouTube video player

हिराबाई दत्तात्रय वडघुले यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विठ्ठल रंगनाथ वडघुले, भगवान विठ्ठल वडघुले, संभाजी विठ्ठल वडघुले, गौरी भगवान वडघुले सर्व रा. कांगोणी रोड, सोनई यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 118(1), 115(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे पुढील तपास करत आहे. दरम्यान काल आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने विठ्ठल वडघुले, भगवान वडघुले, संभाजी वडघुले यांना दोन दिवस पोलीस कोठडी तर गौरी वडघुले हिस न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

ताज्या बातम्या

Rahata : शिर्डीत भाविकांचे दागिने ओरबाडणारा श्रीरामपूरचा सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सुरक्षिततेवर डल्ला मारणार्‍या एका अट्टल आणि रेकॉर्डवरील गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या आहेत. तामिळनाडूमध्ये...