Saturday, July 27, 2024
Homeनाशिकनाशकात खुनाचे सत्र सुरूच; किरकोळ वादातून युवकाची हत्या

नाशकात खुनाचे सत्र सुरूच; किरकोळ वादातून युवकाची हत्या

नाशिक | Nashik

आठवडाभरापूर्वी शहरातील अंबड परिसरात (Ambad Area) एका युवकाची चार ते पाच युवकांनी तीक्ष्ण हत्याराने अवघ्या १० ते १२ सेकंदात २६ वार करत हत्या (Murder) केल्याची घटना घडली होती. त्यानंतर गुरुवार (दि. २४) रोजी पुन्हा एकदा जुने सिडको परिसरातील शिवाजी चौक शॉपिंग सेंटर (Shivaji Chowk Shopping Center) येथे एका भाजी विक्रेत्याची अज्ञात सहा व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना घडली होती.

- Advertisement -

MNS Jagar Yatra : रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे रस्त्यावर, अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर पदयात्रा

या लागोपाठ घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अशातच आता पुन्हा एकदा शहरातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीत एका युवकाची किरकोळ वादातून दोघांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नाशिक शहर हादरून गेले असून या आठवड्यातील ही खुनाची तिसरी घटना आहे.

Jejuri Khandoba Temple : जेजुरीला खंडोबारायाच्या दर्शनासाठी जाताय? मग ही बातमी वाचाच

याबाबत अधिक माहिती अशी की, विश्वनाथ सोनवणे पाटील (२६) असे आज (दि.२७) रोजी हत्या झालेल्या युवकाचे (Youth) नाव असून काल रात्री दारूची पार्टी सुरु असताना मित्रांमध्ये किरकोळ वाद झाले. या वादात शमशेर शेख आणि दीपक सोनवणे या दोघांनी मिळून विश्वनाथ पाटील याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने तो जागीच गतप्राण झाला.

खासदारकीच्या तिकीटाबद्दल बोलताना उदयनराजेंचे सूचक मौन; म्हणाले…

यानंतर दोघाही संशयित आरोपींनी खून केल्यानंतर अपघाताचा (Accident) बनव रचण्यासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयातील पोलीस चौकीवर ड्युटीवर असलेल्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या दोघां संशयितांना ताब्यात घेतले.

उत्तर नाही, उत्तरदायित्वाची सभा! अजित पवारांच्या बीडच्या सभेचा टीझर लाँच, शरद पवारांचा फोटो वापरणे टाळले

दरम्यान, त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी (Police) दोघांची विचारपूर केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर पोलिसांना संशय बळावल्याने त्यांनी या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन गंगापूर पोलिसांच्या (Gangapur Police) ताब्यात दिले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या