धुळे – प्रतिनिधी dhule
शिरपूर (shirpur) तालुका (सांगवी) पोलिसांनी (police) पाठलाग करीत कारमधून गावठी कट्टे घेऊन जाणाऱ्या तरूणांना बेड्या ठोकल्या.
हे तरूण नाशिक येथील (nashik) असून ते कॉलेजला असल्याचे सांगितले. त्याच्याकडून कारसह 3 कट्टे, 6 जिवंत काडतुसह पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने काल ही कारवाई केली. भोईटी गावाजवळ काल पकडले.
इच्छितस्थळी पाकिट पोहचलेच नाही…!
पोलीसांनी पकडलेल्या तरूणांमध्ये मोहीतराम तेजवानी (वय 21, रा. पलंटनं. 10 विंग गोदावरी कॉम्प्लेक्स चिंचबनरोड पंचवटी, नाशिक), आकाश विलास जाधव, (वय 24 रा. रूम नं. 15 देह मंदिर सोसायटी विसे चोक, गंगापुर रोड नाशिक), राज प्रल्हाद मंदोरिया (वय 21 रा. प्लॉट नं. 6 आजाड निवास मधुबन कॉलनी पंचवटी नाशिक), अजय जेठा बोरीस (वय 29 रा. रूम नं. 6 चैतन्य हौसिंग सोसायटी रामवाडी पंचवटी, नाशिक), निवास सुरेंद्र कानडे, (रा. 24 (ब) दिव्य दर्शन सोसायटी, विसे मळा कॉलेज रोड नाशिक) व दर्शन चमनलाल सिधी (वय 21 रा. अजंदे बुद्रुक ता. शिरपुर) अशी या तरुणाची नावे आहेत.
‘गर्भसंस्कार-एक नवीन पाऊल’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद