Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! शिक्षक भरतीसाठी तरुणाचे आंदोलन; मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर मारली उडी

मोठी बातमी! शिक्षक भरतीसाठी तरुणाचे आंदोलन; मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर मारली उडी

मुंबई | Mumbai

महिनाभरापूर्वी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर (Safety Net) अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी (Farmers) उडी मारून आंदोलन केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर एका तरुणाने रखडलेली शिक्षक भरती (Teacher Recruitment) लवकर सुरु करावी तसेच कंत्राटी भरती प्रक्रीया राबवू नये या मागणीसाठी सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केल्याने खळबळ उडाली आहे….

- Advertisement -

Asian Games 2023 : भारतीय घोडेस्वारांची ऐतिहासिक कामगिरी; तब्बल ४१ वर्षांनतर जिंकले सुवर्णपदक

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील आंबाजोगाई (Beed District) येथील हा तरुण असल्याची माहिती समोर आली असून या तरुणाने शिक्षक भरती करावी या मागणीसाठी मंत्रालयात आज आंदोलन (Agitation) केले. यावेळी त्याने लवकरात लवकर शिक्षण भरती करण्यात यावी अशी मागणी केली. सदर तरुण हा उसतोड कामगार आणि प्रकल्पग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे.

Onion Issue News : मुबंईतील बैठकीत कांद्याच्या प्रश्नावर तोडगा नाहीच! वाचा नेमकं आज काय झालं?

दरम्यान, या तरुणाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर मंत्रालयामध्ये एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर मंत्रालयातील पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी (Police and Security) सुरक्षा जाळीवर उडी मारत या तरुणाला बाहेर काढले. यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Rain News : नाशकात पावसाची ‘जोर’ धार; नागरिकांची तारांबळ

- Advertisment -

ताज्या बातम्या