Saturday, May 25, 2024
Homeनाशिकमालेगाव : चोंढी येथे सासर्‍याच्या विहिरीत जावयाची आत्महत्या

मालेगाव : चोंढी येथे सासर्‍याच्या विहिरीत जावयाची आत्महत्या

मालेगाव । Malegoan

सासर्‍याच्या शेतातील विहिरीत उडी घेवून जावयाने आत्महत्या केल्याचा प्रकार तालुक्यातील चोंढी येथे सकाळी घडल्याने गावात खळबळ उडाली.

- Advertisement -

सागर छगन सरोदे (25, रा. दहेगाव, ता. चांदवड) हे त्या आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे. चोंढी येथील सासरे निवृत्ती पुंजाराम चोरमळे यांच्याकडे सागर सरोदे आला होता.

सकाळच्या सुमारास शेतात जावून त्याने पाण्याने भरलेल्या विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपवली. हा प्रकार लक्षात येताच कुटूंबीय व परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.

याप्रकरणी तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद केली असून अधिक तपास हवा. हिरे हे करीत आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या