Friday, April 25, 2025
Homeनगरटॉवरवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

टॉवरवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

करंजी |वार्ताहर| Karanji

पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील वैजूबाभळगाव-पवळवाडी लोहसर-धारवाडी-मिरी या परिसरात बुधवारी (4 डिसेंबर) रात्री साडेनऊ वाजेदरम्यान थरारक घटना घडली. परिसरातील सुमारे शंभर फुट उंचीच्या टॉवरवरून बाळेवाडी येथील एका 32 वर्षांच्या तरुणाने उडी मारून आत्महत्या (Youth Suicide) केली. गोरख घुले असे त्याचे नाव असून, त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

- Advertisement -

पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील वैजूबाभळगाव-पवळवाडी लोहसर-धारवाडी-मिरी या परिसरातून नव्याने कुकाण्याकडे 132 केव्हीची नवीन टॉवर लाईन टाकण्यात आली आहे. एका टॉवरची उंची सुमारे शंभर फूट असून बुधवारी गोरख घुले या तरुणाने या टॉवरवर चढून खाली उडी मारल्याने त्याचा या घटनेत दुर्दैव मृत्यू (Death) झाला आहे. पाथर्डी पोलीस ठाण्याचे (Pathardi Police Station) सहाय्यक उपनिरीक्षक विलास जाधव, हेड कॉन्स्टेबल संभाजी कुसळकर, कॉन्स्टेबल भगवान टकले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गोरख घुलेचा मृतदेह पाथर्डी येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...