पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
तालुक्यातील जातेगाव येथील वनविभागाच्या हद्दीत एका युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ईश्वर अनिल आहेर (वय 21 रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पारनेर तालुक्यातील जातेगाव घाट येथील वन विभागाच्या हद्दीत एका लिंबाच्या झाडाला युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती कारभारी पोटघन यांनी शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान सुपा पोलिसांना फोेनवर दिली.
- Advertisement -
सुपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पचंनामा केला. मयत व्यक्तीच्या खिशात आढळलेल्या पॅनकार्डवर ईश्वर अनिल आहेर असेे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तपास सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक सुनिल कुटे करत आहेत.