Wednesday, June 19, 2024
Homeनगरलग्न केले नाही तर घरातून उचलून घेऊन जाईल

लग्न केले नाही तर घरातून उचलून घेऊन जाईल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

तरुणाने घरात घुसून आई व भावाला धक्का देत अल्पवयीन मुलीसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची घटना भिंगार शहरात शनिवारी (दि. 26) सकाळी घडली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने (वय 17) सोमवारी (दि. 28) रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहन रवी बनसोडे (वय 27 रा. माधवबाग, भिंगार) या तरूणाविरूध्द मारहाण, विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास फिर्यादी अल्पवयीन मुलगी, तिची आई व भाऊ घरात असताना रोहन बनसोडे अनधिकृतपणे त्यांच्या घरात घुसला. त्याने मुलीच्या आई व भावाला धक्का देत बेडरूममध्ये प्रवेश केला. तेथे बसलेल्या अल्पवयीन मुलीचा बळजबरीने हात पकडून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. ‘तू माझ्याशी लग्न केले नाही तर मी तुला घरातून उचलून घेऊन जाईल, तसेच तुझे फोटो माझ्याकडे असून ते एडिट करून ग्रुपवर व्हायरल करून बदनामी करील’, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी सहा. पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी भेट दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या