Saturday, July 27, 2024
Homeनगरयुवकावर शस्त्राने प्राणघातक हल्ला

युवकावर शस्त्राने प्राणघातक हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एका युवकावर अज्ञात व्यक्तीने शस्त्राने प्राण घातक हल्ला केल्याची घटना रविवार रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या दरम्यान नगर शहरातील महेश टॉकीज परिसरात घडली. अमन युनूस शेख (रा. आशा टॉकीज) असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर ताराकपूर परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

दरम्यान घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईक आणि मित्र परिवारांनी रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती.

अमन शेख हा त्याच्या दुचाकीवरून जात असताना महेश टॉकीज जवळ त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या व्यक्ती कोण होत्या याबाबत माहिती समजू शकली नाही. अमन शेखवर धारदार शास्त्राने वार करण्यात आले आहेत.

दरम्यान ही घडल्यानंतर त्याला उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा हल्ला कोणी केला याबाबत माहिती अद्याप समजू शकली नाही. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, तोफखाना निरीक्षक मधुकर साळवे, कोतवाली निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या