अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी धारदार शस्त्र व लाथाबुक्क्यांनी हल्ला करत शिवीगाळ व दमदाटी केली. यामध्ये दोन तरूण जखमी झाले आहेत. ही घटना भिंगार येथील विजय लाईन चौकाजवळील ओकार कॉम्प्युटरसमोर 15 मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी फैजान अख्तर सय्यद (वय 19, रा. विजय लाईन चौक, न्यू ई.एम.ई. कॉलनी, भिंगार) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी फैजान सय्यद व त्यांचा मित्र जिशान अन्सार शेख यांच्यावर सोहेल उर्फ टायगर शेख व अल्तमश पठाण (पूर्ण नावे माहिती नाही, रा. आलमगीर) या दोघांनी जुन्या वादातून अचानक हल्ला चढवला. कार पार्किंगच्या वादातून पूर्वी भांडण झाले होते. त्याच कारणावरून राग मनात ठेवत 15 मे रोजी रात्री सोहेल शेख व अल्तमश पठाण यांनी फैजान सय्यद व जिशान शेख यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर धारदार शस्त्राचा वापर करून दोघांनाही जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, जिवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर जखमींना तत्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. फैजान सय्यद यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सोहेल शेख व अल्तमश पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार व्ही. आर. गारूडकर करीत आहेत.