Friday, April 25, 2025
Homeक्राईमतरूणाकडून युवतीला लग्नासाठी जबरदस्ती; नातेवाईकांनाही घरी जाऊन धमकावले

तरूणाकडून युवतीला लग्नासाठी जबरदस्ती; नातेवाईकांनाही घरी जाऊन धमकावले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर तालुक्यातील एका गावात वस्तीवर राहत असलेल्या युवतीला जबरदस्तीने लग्नासाठी धमकावल्याची घटना रविवारी (09 मार्च) सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्थक दत्तात्रय तिपोळे (रा. उक्कडगाव, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. सार्थक याने रविवारी सकाळी फिर्यादीचे घर गाठले. त्याने तिला माझ्याशी लग्न कर, नाही तर तुला उचलून घेऊन जाईल असे म्हणत जबरदस्तीने तिचा हात धरला व ओढण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

यावेळी फिर्यादीची आई, भाऊ व आणखी एका महिला मध्ये केली असता सार्थकने त्यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. सदर घटनेनंतर पीडितासह तिच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी सार्थक तिपोळे विरोधात शिवीगाळ, विनयभंग, धमकी आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार दिवटे करत आहेत.

पैशाच्या वादातून महिलेशी गैरवर्तन
पैशाच्या वादातून एका महिलेला मारहाण करत त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याची घटना रविवारी (09 मार्च) दुपारी 1:30 च्या सुमारास एमआयडीसीत घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. दीपक राजेंद्र मोरे (रा. आंधळे चौरे कॉलनी, नवनागापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादी आपल्या घरी जेवणासाठी जात असताना दीपकने त्यांना अडवले. फिर्यादीकडे राहिलेले पैसे मागत त्याने त्यांचा हात धरून ओढल्याने त्यांना लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर त्याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. झटापटीदरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे डोरले तुटून गहाळ झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...