Monday, November 25, 2024
Homeधुळेतरुणाचा खून, चार जणांना पोलीस कोठडी

तरुणाचा खून, चार जणांना पोलीस कोठडी

धुळे dhule। प्रतिनिधी

वार ता.धुळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत (procession) विवाहितेला धक्का (shock to the married) दिल्याचा राग येवून तरुणाला तेथून उचलून नेवून कुसुंबा शिवारात नागपूर-सुरत महामार्गालगत हाताबुक्यांनी तोंडावर, छातीवर, गुप्त अंगावर मारहाण (beating) केली. त्यात तरुणाचा (young man) मृत्यू (death)झाला. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी चार जणांना अटक (arrested) करण्यात आली आहे. त्यांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

- Advertisement -

दि.14 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गौतम यशवंत वाघ (वय 22) याने वार येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विवाहितेला धक्का दिला. त्याचा राग येवून सुनिल ईश्वर वाघसह सहा जणांनी गौतमला उचलून नेवून कुसुंबा शिवारात नागपूर-सुरत महामार्गालगत आणले. तेथे सहा जणांनी त्याला हाताबुक्यांनी मारहाण केली. त्याला तोंडावर, छातीवर आणि गुप्त अंगावर मारहाण केल्याने तो जखमी झाला.

त्याला औषधोपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे गौतमचा मृत्यू झाला. सहा जणांनी जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी फिर्याद पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दादाजी भाईदास वाघ यांनी दिली. त्यावरुन भादंवि 302, 307, 143, 147, 149, 136, 323, 504, 506 प्रमाणे विलास उर्फ कैलास ईश्वर वाघ, सुनिल ईश्वर वाघ, युवराज ईश्वर वाघ, रविंद्र उर्फ सोनु रामदास वाघ, ईश्वर दगा वाघ, अंबर उर्फ दादाभाऊ वाघ यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळाला सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी, पोलीस निरिक्षक नितीन भास्करराव देशमुख, उपनिरिक्षक डी.एन. चव्हाण, एम.एस. सैय्यद यांनी भेट देवून घटनेचा आढावा घेतला. पोलिसांनी विलास वाघ, सुनिल वाघ, युवराज वाघ, रविंद्र वाघ यांना अटक केली. तर ईश्वर वाघ आणि अंबर वाघ हे दोघे फरार आहेत.

विवाहितेचा विनयभंग, मयता विरुध्द गुन्हा दाखल

वार ता.धुळे येथे दि.14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत वार येथील 23 वर्षीय विवाहितेचा गौतम यशवंत वाघ याने छेड काढली. त्यावेळी मिरवणुकीत विवाहितेचा हात धरुन ओढल्यामुळे बागडी फुटून त्या विवाहितेला दुखापत झाली. तसेच मिरवणुकीत विवाहितेचा पाठलाग केला. अशी फिर्याद त्या विवाहितेने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिली. भादंवि 354, 354 ड, प्रमाणे मयत गौतम वाघ विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या