Tuesday, May 21, 2024
HomeजळगावYuvarang Youth Festival # सर्वसाधारण विजेतेपदावर मु.जे. ची मोहर, प्रताप महाविद्यालय उपविजेते

Yuvarang Youth Festival # सर्वसाधारण विजेतेपदावर मु.जे. ची मोहर, प्रताप महाविद्यालय उपविजेते

जळगाव jalgaon (प्रतिनिधी) 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) विद्यार्थी विकास विभाग आणि फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळाचे धनाजी नाना कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवात (Yuvarang Youth Festival) जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद (Championship) प्राप्त केले. तरप्रताप महाविद्यालय, अमळनेरचा संघ उपविजेता ठरला.   

- Advertisement -

दि.९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान फैजपूर येथे झालेल्या युवक महोत्सवाचा समारोप सोमवारी प्रसिध्द अभिनेते गौरव मोरे यांच्या उपस्थितीत जल्लोषात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पवार, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, व्य. प. सदस्य तथा युवारंगचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे हजर होते. याशिवाय स्वागताध्यक्ष म्हणून प्रा.सुधाकर चौधरी, अधिसभा सदस्य प्राचार्य सुनील पवार,  प्रा.एकनाथ नेहेते, प्रा.शिवाजी पाटील, प्रा.सुरेखा पालवे, प्रा. पदमाकर पाटील, प्रा. संदीप नेरकर, अमोल मराठे, नेहा जोशी, दिनेश चव्हाण, स्वप्नाली महाजन, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, संस्थेचे पदाधिकारी लिलाधर चौधरी, प्रा.नंदकुमार भंगाळे, प्रा.एस.एस.पाटील, किशोर चौधरी, मुरलीधर फिरके, प्रा.डी.ए. नारखेडे, मिलींद वाघुळदे, संजय चौधरी, प्राचार्य डॉ. पी. आर.चौधरी, प्राचार्य डॉ. व्ही.आर. पाटील, प्राचार्य आर.एल.चौधरी, डॉ.अजित थोरबोले, धनंजय चौधरी, समन्वयक प्रा.शंकर जाधव, सहसमन्वयक प्रा.राकेश तळेले यांची उपस्थिती होती.   

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांनी केवळ कलावंत म्हणून मोठे न होता त्यासोबत माणूस म्हणून देखील मोठे व्हा. यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका. आपल्यातील उणीवा शोधून त्या दूर करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन केले. प्रा.सुधाकर चौधरी यांनी मोठयांचा आदर करणे ही आपली संस्कृती असून तीचा विसर पडू देऊ नका यश तूमच्या मागे येईल असे मत व्यक्त केले. धनंजय चौधरी यांनी स्पर्धा जिंकण्यासाठी असतात तसेच आठवणी जपण्यसाठी देखील असतात. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत सहभाग महत्त्वाचा असतो असे मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी सिलबंद पाकीटातून प्र-कुलगुरुंकडे निकाल सुपूर्द केला. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांकडून अमोल पाटील, संघ व्यवस्थापकांपैकी प्रा.हरेश चौधरी, प्रा. विजय पालवे, डॉ. नंदा वसावे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य पी. आर. चौधरी, प्रा. एस.व्ही.जाधव, प्रा. राकेश तळेले, शेखर महाजन, तुषार फिरके यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.राजेंद्र राजपूत व डॉ.राजश्री नेमाडे यांनी केले. प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी आभार मानले.

पारितोषीकासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करा : हास्य अभिनेता गौरव मोरे

मना देश जय जय खान्देश’ या वाक्याने सुरवात करत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता गौरव मोरे यांनी सादरीकरणाच्या वेळी पडलेल्या टाळया म्हणजे पारितोषिक असते. पारितोषिक मिळाले नाही तरी शेवटपर्यत प्रयत्न करा. यश मिळेल. असा सल्ला देत आम्ही देखील अशाच व्यासपीठावर कला सादर करुन पुढे आलो आहोत. मात्र मेहनत आणि परिश्रमाची तयारी ठेवा. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. स्पर्धेत हरलो असे नाही तर आपले प्रयत्न अपूर्ण पडले यावर लक्ष द्या. असा सल्ला अभिनेता गौरव मोरे यांनी दिला.

बक्षीस वितरण समारंभाचे मुख्य आकर्षण हे प्रसिद्ध विनोदी कलाकार गौरव मोरे हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होते. युवकांचे विशेष आकर्षण गौरव मोरे यांनी आपली सिग्नेचर स्टेप व डायलॉग म्हणत सर्वच विद्यार्थ्यांचे मन जिंकली, तसेच प्रसिद्ध अहिराणी गीत तु झुमका वाली पोर….. हे गीत गात तरुणाईने त्यांच्यासोबत ठेका धरला त्या सोबतच त्याचे नावाजलेले संवाद सादर करून विनोदासाठी प्रसिद्ध असलेला त्याचा रुतबा दाखवीत सर्वांना हसवविले, तसेच त्यांच्या हस्ते विविध कला गुणांत विशेष प्राविण्य प्राप्त केलेले प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

पुढील युवारंग ची जबाबदारी द्यावी : डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, इतर कलावंतांकडून प्रेरणा घेतली तर यश नक्की मिळेल. पुढील युवारंगची जबाबदारी विद्यापीठाने आमच्या संस्थेकडे दिल्यास चांगले आयोजन करु असे ते म्हणाले.

डॉ. उल्हास पाटील

युवारंग स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:-  

१)       संगीत विभाग  

 • शास्त्रीय गायन:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), महात्मा गांधी शि.मं.चे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (तृतीय)  

 • शास्त्रीय वादन (तालवाद्य):- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), एस.एस.मणियार विधी महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), महात्मा गांधी शि.मं.कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (तृतीय)  

 • शास्त्रीय वादन(स्वरवाद्य):- महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), आय.एम.आर., जळगाव (तृतीय)  

 • नाट्य संगीत:-  मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ द्वितीय), कबचौउमवि शैक्षणिक प्रशाळा, जळगाव (तृतीय)  

 • सुगम गायन (भारतीय):- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), प्रताप महाविद्यालय,अमळनेर (तृतीय)  

 • पाश्चिमात्य गायन :- प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), महात्मा गांधी शि.मंचे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), जी.एच.रायसोनी इन्स्टीट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंट,जळगाव (तृतीय)  

 • समुह गायन (भारतीय):-  प्रताप महाविद्यालय,अमळनेर (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (व्दितीय),  महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (तृतीय) 

 • समुह गायन (पाश्चिमात्य):- महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), प्रताप महाविद्यालय,अमळनेर (तृतीय)  

 • लोकसंगीत (वाद्यवृंद):- महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम),  मु.जे.महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), प्रताप महाविद्यालय,अमळनेर (तृतीय)  

 • पाश्चिमात्य वाद्यसंगीत:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव(प्रथम), जी.एच.रायसोनी इन्स्टीट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंट,जळगाव (द्वितीय), पीएसजीव्हीपीएस महाविद्यालय, शहादा (तृतीय)  

२)       नृत्य विभाग  

 • समुह लोकनृत्य:-  प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (तृतीय)  

 • शास्त्रीय नृत्य:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), जी.एस.रायसोनी इन्स्टीटयुट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंट,जळगाव (द्वितीय),नानासाहेब य.ना.चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव (तृतीय)  

३)       साहित्य कला  

 • वक्तृत्व:- विद्यावर्धिनी महाविद्यालय,धुळे (प्रथम), प्रताप महाविद्यालय,अमळनेर (द्वितीय), श्रमसाधना बॉम्बे ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बांभोरी (तृतीय)  

 • वादविवाद:- विद्यावर्धिनी महाविद्यालय,धुळे (प्रथम), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (द्वितीय), डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालय, जळगाव (तृतीय)  

४)       नाट्य कला  

 • विडंबननाट्य:- प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम),एस.एस.व्ही.पी.एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, धुळे (द्वितीय), पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे फार्मसी महाविद्यालय, शहादा (तृतीय)  

 • मुकनाट्य:-  मु.जे.महाविद्यालय, जळगाव (प्रथम), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (व्दितीय), पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा (तृतीय)  

 • मिमिक्री:- मु.जे.महाविद्यालय, जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (व्दितीय), पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा (तृतीय),  

५)       ललित कला  

 • रांगोळी:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव(प्रथम), एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर (द्वितीय), कला, वाणिज्य, विज्ञान  महाविद्यालय,  कुऱ्हा कोकोडा (तृतीय)  

 • व्यंगचित्र:- शिरीष चौधरी महाविद्यालय, जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (व्दितीय), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (तृतीय)  

 • कोलाज:- महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव (तृतीय)  

 • क्ले मॉडेलिंग:- धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा(द्वितीय), मु.जे. महाविद्यालय, जळगाव  (तृतीय)  

 • स्पॉट पेंटिग:- बी.पी.आर्टस, एसएमए सायन्स, केकेसी कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव(व्दितीय), संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर (तृतीय)  

 • पोस्टर मेकींग:- के.सी.ई.शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव (प्रथम), मु.जे. महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), बी.पी.आर्टस, एसएमए सायन्स, केकेसी कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव (तृतीय)  

 • इन्स्टॉलेशन:- सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर (प्रथम), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (द्वितीय), बी.पी.आर्टस, एसएमए सायन्स, केकेसी कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव (तृतीय)  

 • फोटोग्राफी:- ), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), के.सी.ई.शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय, जळगाव (तृतीय)  

 • मेहंदी:- शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय,जळगाव (प्रथम), श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाचोरा (द्वितीय), काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार (तृतीय)  

 • पोस्टर प्रदर्शन :- धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर (प्रथम), शहादा तालुका केा-ऑप एज्य. सोसा.चे विज्ञान महाविद्यालय, शहादा (द्वितीय), मु. जे. महाविद्यालय, जळगाव (तृतीय) 

  गट निहाय विजेतेपद  

१.     संगीत गट             : मु.जे.महाविद्यालय,जळगाव           

२.     नृत्य गट                : मु.जे.महाविद्यालय,जळगाव                       

३.     साहित्य कला गट   :  विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे 

४.      नाट्य गट              : मु.जे.महाविद्यालय,जळगाव आणि प्रताप महाविद्यालय, अमळनेर  

५.     ललित कला गट     : मु.जे.महाविद्यालय,जळगाव      

      जिल्हानिहाय प्रोत्साहनपर फिरतेचषक 

जळगाव जिल्हा (डॉ.अरविंद चौधरी पुरस्कृत स्व.वसुंधरा चौधरी चषक ) :               

महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, चोपडा 

 धुळे जिल्हा (प्रा.मुक्ता महाजन पुरस्कृत स्व.शांताबाई महाजन चषक ) :     

 विद्यावर्धिनी  महाविद्यालय, धुळे 

 नंदुरबार जिल्हा (प्रा.सुनील कुलकर्णी पुरस्कृत स्व.बाबुराव कुलकर्णी देशगव्हाणकर चषक

पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा 

 सर्वसाधारण विजेतेपद   

विजेता       : मु.जे.महाविद्यालय,जळगाव  (डॉ. जी.डी.बेंडाळे स्मृती चषक)  

उपविजेता  : प्रताप महाविद्यालय, अमळनेर  (कै.कुसुमताई मधुकरराव चौधरी स्मृती चषक)

- Advertisment -

ताज्या बातम्या