Tuesday, October 22, 2024
Homeक्राईमझापवाडी शिवारात महिलेची हत्या करणारा जेरबंद

झापवाडी शिवारात महिलेची हत्या करणारा जेरबंद

गेल्या महिन्यातील घटना || जादूटोण्याच्या संशयाचे कारण || दोघेही दौंड तालुक्यातील

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील झापवाडीशिवारात गेल्या महिन्यात (16 सप्टेंबर) झापवाडी शिवारात महिलेच्या आढळलेल्या मृतदेहाचा शोध लावण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले. सदर महिलेची हत्या करणार्‍या संशयितास अटक करण्यात आली असून महिला जादूटोणा करीत असल्याच्या संशयातून त्याने गळा आवळून तिचा खून केल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत माहिती अशी की, 16 सप्टेंबर रोजी झापवाडी शिवारात मुळा कॅनॉललगत शेतामध्ये अंदाजे 60 वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस उपनिरीक्षक सुरज मेडे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिला होता. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखालील पथक तपास करत होते. सीसीटीव्ही फुटेज घेऊन जिल्ह्यातील बेपत्ता महिलांची माहिती घेऊन फोटो सोशल मीडिया व गुप्त बातमीदारास प्रसारीत केले होते. त्यातून सदर अनोळखी महिलेचे नाव जिजाबाई भाऊसाहेब रुपनवर (वय 70) रा. एकेरीवाडी, पो. देलवडी, ता. दौंड, जि. पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने महिलेच्या राहते ठिकाणच्या आजूबाजूस राहणार्‍या लोकांकडे विचारपूस केली. महिला त्या दिवशी काष्टी येथे आरोपीसोबत होती, अशी माहिती मिळाली.

तपासात सदरचा गुन्हा महादेव आनंदा महारनवर, रा. एकेरीवाडी, ता. दौंड याने केला असल्याचे निष्पन्न झाले. संशयितास ताब्यात घेऊन विचारपूस करता 15 सप्टेंबर रोजी 12 वाजण्याच्या सुमारास तो मयत महिला जिजाबाई भाऊसाहेब रूपनवर हिचेसह मोटार सायकलवरून एकेरीवाडी येथून शनिशिंगणापूरकडे जात होते. झापवाडी शिवारात मुळा कॅनॉलजवळ मयत महिला हिने गाडी थांबवून आरोपीसह शेतामध्ये पूजा करीत असताना, मयत महिला ही आरोपीवर काहीतरी जादुटोणा करीत असल्याच्या संशयावरून आरोपीने तिचा गळ्यातील स्कार्पने गळा आवळून तिस जीवे ठार मारल्याचे सांगितले. तसेच मयत महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागीने काढून नेलेले होते. गुन्ह्याच्या तपासामध्ये 56 हजार रुपये किंमतीचे 8 ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत करण्यात आले. आरोपीस सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं.387/2024 बीएनएस कलम 103 (1) या गुन्ह्याच्या तपासकामी मुद्देमालासह सोनई पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या