Saturday, July 25, 2026
Homeक्राईमझेंडीगेट परिसरात 68 हजाराचे गोमांस पकडले

झेंडीगेट परिसरात 68 हजाराचे गोमांस पकडले

कोतवाली पोलिसांची दोन ठिकाणी छापेमारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरात दोन ठिकाणी छापेमारी करून 68 हजार रूपये किमतीचे गोमांस जप्त केले. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई मंगळवारी (6 ऑगस्ट) दुपारी केली आहे.
वसीम अस्लम तांबोळी (वय 24 रा. मंगलगेट, कोठला) हा झेंडीगेट परिसरात कारी मस्जिदच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री करत असताना पकडला. त्याच्या ताब्यातून 40 किलो गोमांस, एक चाकू व एक वजन काटा असा आठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अंमलदार अतुल काजळे यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेपारी मोहल्ला परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री करताना इरफान फारूक कुरेशी (वय 36 रा. बेपारी मोहल्ला) याला पकडले. त्याच्याकडे 60 हजार रूपये किमतीचे गोमांस, एक चाकू व एक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार सुरज कदम यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Thackeray Brothers : उद्याचा मोर्चा होणारच; ठाकरे बंधूंची घोषणा

0
मुंबई | Mumbai दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) तर्फे सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. वाढत्या दबावानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री...