Thursday, February 5, 2026
Homeक्राईमCrime News : झेंडीगेट कत्तलखान्यावर छापा; 400 किलो गोमांस जप्त

Crime News : झेंडीगेट कत्तलखान्यावर छापा; 400 किलो गोमांस जप्त

सहा गोवंशीय जनावरांची सुटका || गुन्हे शाखेची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

झेंडीगेट, येथील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून 400 किलो गोमांस जप्त केले. या कारवाईत 2 लाख 60 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश भिंगारदे, संतोष खैरे, बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, शिवाजी ढाकणे, भगवान थोरात यांनी ही कारवाई केली.

- Advertisement -

कुरेशी (रा.झेंडीगेट) याने त्याच्या राहत्या घराजवळ काही इसमांच्या मदतीने गोवंशी जातीची जनावरे कत्तल करण्यासाठी आणली आहेत. पथकाने पंचासमक्ष छापा टाकला असता, तीन इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करताना दिसून आले. तसेच आजूबाजूला काही जिवंत गोवंशीय जनावरे डांबून ठेवलेले होते. पथकाने छापा टाकून कारवाई करताना एक इसम पळून गेला.

YouTube video player

सलीम मुसा शेख (वय 30, रा.कोठला, घासगल्ली), जहीद समद कुरेशी (वय 20, रा. व्यापारी मोहल्ला) अशी दोघांची नावे सांगितली. ताब्यातील आरोपीस पळून गेलेल्या इसमाचे नाव विचारले असता त्याचे नाव असिफ कुरेशी (रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) असे सांगितले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून गोवंशाची सुटका केली आहे.

ताज्या बातम्या

Crime News : धक्कादायक! काका व चुलत भावाकडून तरुणाची हत्या

0
सोनई |वार्ताहर| Sonai सोनई-कांगोणी रस्त्यावरील वडघुले वस्ती येथे मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी रात्री जुन्या घरी आल्याच्या कारणावरून चुलता व चुलत भावांनी भावाची हत्या केल्याची घटना...