Saturday, July 25, 2026
Homeक्राईमCrime News : झेंडीगेट परिसरात दुमजली घरात कत्तलखाना

Crime News : झेंडीगेट परिसरात दुमजली घरात कत्तलखाना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिका व पोलिसांनी कारवाई करून झेंडीगेट परिसरातील एकुण सात कत्तलखाने उध्वस्त केले असले तरी या परिसरात गोवंशीय जनावरांची घरामध्ये कत्तल होत असल्याचे समोर आले आहे. कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरातील कुरेशी मोहल्ला, सुभेदार गल्ली येथील एका दुमजली घरामध्ये केलेल्या कारवाईत गोवंशीय जनावरांची अवैधरित्या कत्तल करताना एक जण रंगेहाथ पकडला. दोन जण पसार झाले आहेत.

- Advertisement -

ही कारवाई शनिवारी (20 सप्टेंबर) सकाळी 10.30 वाजता करण्यात आली. तिघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर अकील शेख (वय 20, रा. गांधीनगर, बोल्हेगाव), नसीर कुरेशी (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), अप्पु ऊर्फ अफ्रोज कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती आल्यानंतर पोलीस पथकाने छापा टाकला. यावेळी समीर शेख हा इसम पकडला गेला. तर नसीर कुरेशी व अफ्रोज कुरेशी हे दोघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

छाप्यामध्ये सुमारे 212 किलो गोमांस, लोखंडी कुर्‍हाड, सुरी अशा हत्यारांसह एकूण 42 हजार 400 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, अंमलदार संतोष बनकर, व्ही. आर. पठाण, बाळकृष्ण दौंड, विनोद बोरगे, अविनाश वाकचौरे, विजय ठोंबरे, राम हंडाळ, सोमनाथ केकाण, प्रतिभा नागरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

Onion Rate : घोडेगावातील कांद्याचा वाचा भाव

0
नेवासा | Newasa येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) शनिवारी कांद्याची 55 हजार 373 गोण्या आवक झाली. भाव 2700 रुपयांपर्यंत...