Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar : यंदा 2017 प्रमाणेच गट आणि गणांचे आरक्षण?

Ahilyanagar : यंदा 2017 प्रमाणेच गट आणि गणांचे आरक्षण?

जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणूक || ओबीसींचे आरक्षण लॉटरीनुसार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गेल्या साडेतीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका नोंव्हेबर अथवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणूका या 2017 आरक्षणानूसार होणार असल्या तरी आत्ताची लोकसंख्या गृहीत धरून त्यानूसार सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीसी, ओबीसी महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जाती महिला तसेच अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमाती महिलांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यात राखीव असणारे गट सोडून ओबीसी असणार्‍या गटात लॉटरी पध्दत अवलंबण्यात येणार असून त्यानूसार यंदाचे जिल्हा परिषद व पंचायत समित्याचे आरक्षण काढण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात 2017 ला जिल्हा परिषद व पंचायत समित्यासाठी निवडणूका झाल्या होत्या. त्यानंतर 2021 ला तत्कालीन राज्य सरकारच्यावतीने नव्याने ओबीसींच्या वाढीव आरक्षणानूसार गट आणि गणांच्या सोडती काढण्यात आल्या. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी सरकारने ओबीसींच्या वाढीव आरक्षणासह काढलेल्या सोडती रद्द ठरवत 2017 च्या ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणानूसार नव्याने गट आणि गणांचे आरक्षण निश्चित करत निवडणूका घेण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोपवण्यात आला आहे.

YouTube video player

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने देखील 2017 ला नूसार सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीसी, ओबीसी महिला, अनुसूचित जाती व जमाती महिला व पुरूष यानूसार आरक्षण काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यात राखीव मतदारसंघातील आरक्षण बदलणार नसले तरी ओबीसी मतदारसंघासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. यात प्रत्येक तालुक्यात ओबीसी लोकसंख्येनूसार ओबीसी पुरुष व महिला, सर्वसाधारण पुरूष आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण काढण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, काढण्यात येणार्‍या आरक्षणाबाबत राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असून त्यानूसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडती काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

2017 ला नगर जिल्ह्यात असणार्‍या 73 जिल्हा पषिद गटापैकी 37 गट हे सर्वसाधारण (पुरुष व महिला), 20 गट हे ओबीसी (पुरुष व महिला), अनुसूचित जाती (पुरूष व महिला) 7 आणि अनुसूचित जमाती (पुरूष व महिला) 9 असे राखीव होते. यात त्यावेळी असणार्‍या राखीव गटांची संख्या तीच राहणार असून केवळ रोटेशननूसार आरक्षण बदलणार असल्याचे निवडणूक विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

झेडपी अध्यक्षपद राखीव ?
मोठ्या प्रतिक्षेनंतर होणार्‍या जिल्हा व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे राखीव प्रवर्गासाठी निघणार असल्याचा अंदाज काही माजी सदस्यांनी व्यक्त केला आहे. गेली अनेक वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष खुल्या अथवा खुल्या प्रवर्गातील महिला अथवा ओबीसीसाठी राखीव निघाले होते. यामुळे यंदा जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे राखीव वर्गासाठी निघणार असल्याने अनेकांचा आतापासून हिरमोड होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...