Thursday, July 23, 2026
HomeनगरAhilyanagar : झेडपीची अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबरला

Ahilyanagar : झेडपीची अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबरला

हरकतीची मुदत संपली; आता पुढील प्रशासकीय तयारी सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. ही प्रारूप मतदार यादी बुधवार 8 ऑक्टोबरला प्रसिध्द करण्यात आली असून त्यावर मंगळवार (दि.14) पर्यंत हरकती घेण्यासाठी मुदत होती. ती मुदत संपली असून तालुकानिहाय दाखल हरकतींवर जिल्हाधिकारी सुनावणी घेवून 28 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीच्या सदस्यांचे आरक्षणही जाहीर झालेले आहे. त्यानंतर मागील आठवड्यात प्रसिध्द झालेल्या प्रारूप मतदार यादीवर जिल्हाधिकारी सुनावणी घेणार असून प्रारूप यादीवर दाखल हरकतींची माहिती प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 3 हजार 689 मतदान केंद्र राहणार आहेत. तर 30 लाख 7 हजार 404 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी मुदतवाढ
जिल्ह्यात 11 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मागील आठवड्यात प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याची मुदत 13 तारखेला संपली. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी हरकती घेण्यासाठी 17 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. जिल्ह्यात अनेक नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेतांना मतदार दिसत आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : रक्तपेढीला मिळाले अखेर उद्घाटनाचे टॉनिक!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक भारतीय प्रतिभूती मुद्रणालय म्हणजेच इंडिया सियुरिटी प्रेसने आपल्या सीएसआर फंडातून दिलेल्या तीन कोटी बासष्ट लाख रुपये...